कर्तव्य भूमीचे पुजारी शिक्षणमहर्षी बापूसाहेब लाखनीकर ग्रंथ प्रकाशित
बापूसाहेब लाखनीकर जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन
स्थानिक समर्थ महाविद्यालय लाखनी येथे राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे संस्थापक बापूसाहेब लाखनीकर यांच्या 107 व्या जयंतीनिमित्त विवेक कवठेकर लिखित व हिंदुस्थान प्रकाशन संस्था मुंबई द्वारा प्रकाशित कर्तव्य भूमीचे पुजारी बापूसाहेब लाखनीकर या ग्रंथाच विमोचन सोहळा नुकताच पार पडला.
बापूसाहेब लाखनीकर यांच्या कार्याचा विस्तृत अहवाल समाजापर्यंत पोहोचावा म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शताब्दीचे औचित्य साधून बापूसाहेब लाखनीकर यांच्या का प्पहा एक ग्रंथ याचा विमोचन सोहळ्याप्रसंगी महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते तर माजी मंत्री डॉ. परिणय फुके, राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आल्हाद भांडारकर, प्राचार्य दिगांबर कापसे, शिवलाल रहांगडाले, श्रीमती शिलाताई भांडारकर, प्रकाश बाळबुद्धे, उमराव बावनकुळे, देवाजी पडोळे, बाळाजी अंजनकर, संजय कुंभलकर, हेमंत देशमुख, हेमंत बांडेबुचे, तिलक वैद्य, अनिल शिवणकर, कैलास कुरंजेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
बापूसाहेब लाखनीकरांनी शिक्षणाची कार्य देवकार्य धर्मकार्य समजून पुढे नेले आपली सर्व संपत्ती या ज्ञानकुंडात खर्च केले मागासलेल्या परिसरात शिक्षणाची गंगा आणली, त्यामुळे त्यांच्यापुढे नतमस्तक व्हावे लागेल असे हे कार्य आहे असे सांगून राष्ट्रीय शिक्षण संस्थेला असलेल्या सर्व अडचणी दूर करण्याची आश्वासन श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
प्रमुख उपस्थिती डॉ परिणय फुके यांनी बापूसाहेबांची कार्य उभ्या महाराष्ट्राला माहीत व्हावे तसं या पुस्तकाचे स्वागत सर्वत्र केला जाईल असे सांगून राष्ट्रीय शिक्षण संस्थेने वेळोवेळी राष्ट्रकार्यासाठी पुढाकार घेतलेला आहे अशी त्यांनी यावेळी माहिती दिली.
याप्रसंगी शिवराम गिरहेपुंजे व इतर उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी राष्ट्रीय शिक्षण संस्थे अंतर्गत असलेले महाविद्यालय, विद्यालय, प्राथमिक शाळा, वस्तीगृहे, वाचनालय येथील ४०० कर्मचाऱ्यांची उपस्थिती लाभलेली होती.
ग्रंथ प्रकाशन सोहळ्याचे व शिक्षक मेळाव्याचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आल्हाद भांडारकर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा पद्मजा कुळकर्णी व आभार प्राचार्य दिगंबर कापसे यांनी मानले.