टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती

स्वतंत्र भारतात कर्तृत्व भावनेने व्यवहार करणे हेच खरे टिळकांना अभिवादन
~ प्राचार्य डॉ . दिगांबर कापसे

समर्थ महाविद्यालय, लाखनी येथे 1 ऑगस्ट रोज मंगळवारला टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना एकीकडे भारत सर्व आघाड्यांवर प्रगतीची शिखरे गाठत आहे तर दुसरीकडे मानवतेवर प्रश्न निर्माण करणाऱ्या घटनांची मालिका सुरू आहे. प्रत्येक नागरिकाने भारतीय राज्यघटनेने व मानवीय दृष्टिकोनातून घालून दिलेले आदर्श व कर्तव्य याची जाणीव ठेवत व्यवहार ठेवला तर भारताच्या प्रगतीला खऱ्या अर्थाने सर्वसमावेशकता येईल. यामुळेच टिळकांना अभिप्रेत असलेले स्वराज्य भारतात अवतरेल असे प्रतिपादन प्राचार्य डॉ दिगांबर कापसे यांनी केले. राष्ट्रीय सेवा योजना, आजीवन अध्ययन मंडळ, यांच्या वतीने टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी लाखनी पोलीस उपनिरीक्षक आशिष चिलांगे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दिगांबर कापसे, भंडारा जिल्हा महिला बालकल्याण अधिकारी विजय नंदागवळी, लाखनी तालुका महिला बालकल्याण अधिकारी अमित गजभिये, डॉ धनंजय गभने, महिला तक्रार विभाग प्रमुख डॉ संगीता हाडगे प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन डॉ बंडू चौधरी व आभार डॉ संगीता हाडगे यांनी मानले.