प्रज्ञाभारती डॉ. श्रीधर भास्कर वर्णेकर जयंती
राष्ट्रीय शिक्षण संस्था, लाखनी व्दारा संचालित समर्थ महाविद्यालय, लाखनी येथे सोमवार दिनांक ३१ जुलै २०२३ रोजी संस्कृत विभागाव्दारे वैदर्भीय संस्कृत महाकवी प्रज्ञाभारती डॉ. श्रीधर भास्कर वर्णेकर यांची जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा . लालचंद मेश्राम होते. तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा .डॉ स्मिता गजभिये व प्रा डॉ .अर्चना मोहोड प्रामुख्याने उपस्थित होत्या.
डॉ श्रीधर भास्कर वर्णेकर यांची संस्कृत भाषेतील साहित्य संपदा इतकी मोठी आहे की त्या साहित्याचा अभ्यास व त्याचे ज्ञान आपल्याला करता यावे याकरिता इतर भाषेप्रमाणे संस्कृत भाषा ही आपल्याला अवगत असायला हवी असे आपल्या अध्यक्षीय भाषणातून प्रा. मेश्राम यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रास्ताविक व आभार प्रा. रुपाली खेडीकर यांनी केले.