Author Archives: samarthcollege

गुरू पौर्णिमा उत्सव निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन

स्थानिक राष्ट्रीय शिक्षण संस्था द्वारा संचालित समर्थ महाविद्यालय, लाखनी येथे आज गुरू पौर्णिमा उत्सव निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन आज दिनांक 3 जुलै रोज सोमवारला करण्यात आले होते. समर्थ महाविद्यालय येथील सांस्कृतिक विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने गुरू पौर्णिमा व्याख्यान आयोजित करण्यात आले. या व्याख्यानाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी मुख्याध्यापिका सौ संध्या हेमणे व अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ दिगांबर कापसे व सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ बंडू चौधरी उपस्थित होते. गुरू प्रती विश्वास शिष्याने जपला पाहिजे. गुरू शिष्यांचे नाते जगात अनमोल आहे. या बाबद माजी मुख्याध्यापिका सौ. संध्या हेमणे यांनी विविध दाखले देत गुरूची महती हे सांगत असताना शिष्याने आपल्या गुरु प्रति आत्मसन्मान बाळगत स्वतःची प्रगती साधून गुरुदक्षिणा देणे यापेक्षा मोठे रून नाही. याप्रसंगी डॉ कापसे यांनी महाभारतातील व्यक्तिरेखा व दाखले देत अर्जुन आणि श्रीकृष्ण यांचे गुरू शिष्य यांचे नाते स्पष्ट केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ बंडू चौधरी यांनी तर संचालन प्रा. रुपाली खेडीकर व आभार प्रा. युवराज जांभूळकर यांनी मानले.

कर्तव्य भूमीचे पुजारी शिक्षणमहर्षी बापूसाहेब लाखनीकर ग्रंथ प्रकाशित

बापूसाहेब लाखनीकर जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

स्थानिक समर्थ महाविद्यालय लाखनी येथे राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे संस्थापक बापूसाहेब लाखनीकर यांच्या 107 व्या जयंतीनिमित्त विवेक कवठेकर लिखित व हिंदुस्थान प्रकाशन संस्था मुंबई द्वारा प्रकाशित कर्तव्य भूमीचे पुजारी बापूसाहेब लाखनीकर या ग्रंथाच विमोचन सोहळा नुकताच पार पडला.

बापूसाहेब लाखनीकर यांच्या कार्याचा विस्तृत अहवाल समाजापर्यंत पोहोचावा म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शताब्दीचे औचित्य साधून बापूसाहेब लाखनीकर यांच्या का प्पहा एक ग्रंथ याचा विमोचन सोहळ्याप्रसंगी महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते तर माजी मंत्री डॉ. परिणय फुके, राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आल्हाद भांडारकर, प्राचार्य दिगांबर कापसे, शिवलाल रहांगडाले, श्रीमती शिलाताई भांडारकर, प्रकाश बाळबुद्धे, उमराव बावनकुळे, देवाजी पडोळे, बाळाजी अंजनकर, संजय कुंभलकर, हेमंत देशमुख, हेमंत बांडेबुचे, तिलक वैद्य, अनिल शिवणकर, कैलास कुरंजेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

बापूसाहेब लाखनीकरांनी शिक्षणाची कार्य देवकार्य धर्मकार्य समजून पुढे नेले आपली सर्व संपत्ती या ज्ञानकुंडात खर्च केले मागासलेल्या परिसरात शिक्षणाची गंगा आणली, त्यामुळे त्यांच्यापुढे नतमस्तक व्हावे लागेल असे हे कार्य आहे असे सांगून राष्ट्रीय शिक्षण संस्थेला असलेल्या सर्व अडचणी दूर करण्याची आश्वासन श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

प्रमुख उपस्थिती डॉ परिणय फुके यांनी बापूसाहेबांची कार्य उभ्या महाराष्ट्राला माहीत व्हावे तसं या पुस्तकाचे स्वागत सर्वत्र केला जाईल असे सांगून राष्ट्रीय शिक्षण संस्थेने वेळोवेळी राष्ट्रकार्यासाठी पुढाकार घेतलेला आहे अशी त्यांनी यावेळी माहिती दिली.

याप्रसंगी शिवराम गिरहेपुंजे व इतर उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी राष्ट्रीय शिक्षण संस्थे अंतर्गत असलेले महाविद्यालय, विद्यालय, प्राथमिक शाळा, वस्तीगृहे, वाचनालय येथील ४०० कर्मचाऱ्यांची उपस्थिती लाभलेली होती.

ग्रंथ प्रकाशन सोहळ्याचे व शिक्षक मेळाव्याचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आल्हाद भांडारकर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा पद्मजा कुळकर्णी व आभार प्राचार्य दिगंबर कापसे यांनी मानले.