
समर्थ महाविद्यालयाच्या “अर्चना” वार्षिकांकाला विद्यापीठाचा पुरस्कार

समर्थ महाविद्यालयाच्या “अर्चना” वार्षिकांकाला विद्यापीठाचा पुरस्कार

शिक्षकांना तुळस रोप भेट देत शिक्षक दिन साजरा





स्वतंत्र भारतात कर्तृत्व भावनेने व्यवहार करणे हेच खरे टिळकांना अभिवादन
~ प्राचार्य डॉ . दिगांबर कापसे
समर्थ महाविद्यालय, लाखनी येथे 1 ऑगस्ट रोज मंगळवारला टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना एकीकडे भारत सर्व आघाड्यांवर प्रगतीची शिखरे गाठत आहे तर दुसरीकडे मानवतेवर प्रश्न निर्माण करणाऱ्या घटनांची मालिका सुरू आहे. प्रत्येक नागरिकाने भारतीय राज्यघटनेने व मानवीय दृष्टिकोनातून घालून दिलेले आदर्श व कर्तव्य याची जाणीव ठेवत व्यवहार ठेवला तर भारताच्या प्रगतीला खऱ्या अर्थाने सर्वसमावेशकता येईल. यामुळेच टिळकांना अभिप्रेत असलेले स्वराज्य भारतात अवतरेल असे प्रतिपादन प्राचार्य डॉ दिगांबर कापसे यांनी केले. राष्ट्रीय सेवा योजना, आजीवन अध्ययन मंडळ, यांच्या वतीने टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी लाखनी पोलीस उपनिरीक्षक आशिष चिलांगे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दिगांबर कापसे, भंडारा जिल्हा महिला बालकल्याण अधिकारी विजय नंदागवळी, लाखनी तालुका महिला बालकल्याण अधिकारी अमित गजभिये, डॉ धनंजय गभने, महिला तक्रार विभाग प्रमुख डॉ संगीता हाडगे प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन डॉ बंडू चौधरी व आभार डॉ संगीता हाडगे यांनी मानले.

समर्थ महाविद्यालय लाखनी तसेच महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र शासन, लाखनी केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने समर्थ महाविद्यालयातील महिला तक्रार निवारण समिती, सांस्कृतिक विभागा अंतर्गत विद्यार्थिनींना ‘स्वसंरक्षण प्रशिक्षण व टिळक पुण्यतिथी आणि अण्णा भाऊ साठे जयंती’ कार्यक्रमाचे आयोजन मंगळवार दि.१/८/२०२३ रोजी करण्यात आलेले आहे.


राष्ट्रीय शिक्षण संस्था, लाखनी व्दारा संचालित समर्थ महाविद्यालय, लाखनी येथे सोमवार दिनांक ३१ जुलै २०२३ रोजी संस्कृत विभागाव्दारे वैदर्भीय संस्कृत महाकवी प्रज्ञाभारती डॉ. श्रीधर भास्कर वर्णेकर यांची जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा . लालचंद मेश्राम होते. तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा .डॉ स्मिता गजभिये व प्रा डॉ .अर्चना मोहोड प्रामुख्याने उपस्थित होत्या.
डॉ श्रीधर भास्कर वर्णेकर यांची संस्कृत भाषेतील साहित्य संपदा इतकी मोठी आहे की त्या साहित्याचा अभ्यास व त्याचे ज्ञान आपल्याला करता यावे याकरिता इतर भाषेप्रमाणे संस्कृत भाषा ही आपल्याला अवगत असायला हवी असे आपल्या अध्यक्षीय भाषणातून प्रा. मेश्राम यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रास्ताविक व आभार प्रा. रुपाली खेडीकर यांनी केले.


स्थानिक राष्ट्रीय शिक्षण संस्था द्वारा संचालित समर्थ महाविद्यालय, लाखनी येथे आज गुरू पौर्णिमा उत्सव निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन आज दिनांक 3 जुलै रोज सोमवारला करण्यात आले होते. समर्थ महाविद्यालय येथील सांस्कृतिक विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने गुरू पौर्णिमा व्याख्यान आयोजित करण्यात आले. या व्याख्यानाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी मुख्याध्यापिका सौ संध्या हेमणे व अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ दिगांबर कापसे व सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ बंडू चौधरी उपस्थित होते. गुरू प्रती विश्वास शिष्याने जपला पाहिजे. गुरू शिष्यांचे नाते जगात अनमोल आहे. या बाबद माजी मुख्याध्यापिका सौ. संध्या हेमणे यांनी विविध दाखले देत गुरूची महती हे सांगत असताना शिष्याने आपल्या गुरु प्रति आत्मसन्मान बाळगत स्वतःची प्रगती साधून गुरुदक्षिणा देणे यापेक्षा मोठे रून नाही. याप्रसंगी डॉ कापसे यांनी महाभारतातील व्यक्तिरेखा व दाखले देत अर्जुन आणि श्रीकृष्ण यांचे गुरू शिष्य यांचे नाते स्पष्ट केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ बंडू चौधरी यांनी तर संचालन प्रा. रुपाली खेडीकर व आभार प्रा. युवराज जांभूळकर यांनी मानले.